Tuesday 17 May 2016

'व्यवसाय यशस्वी होण्यासाठी सामाजिक मूल्ये जपा' ..राहुल बजाज

मुंबई दि. ७ मे २०१६:  व्यापार-व्यवसाय आणि समाज यांचे संबंध सध्या बर्याच अंशी दुराव्याचे आणि संशयाचेही आहेत. आपल्या उद्द्योगपतींची आणि व्यवसायिकांची समाजातील प्रतिमा अभिमान वाटावा अशी नाही. परंतु नैतिकता आणि  आदर्श समाजिक मुल्ये जपून उद्दोगव्यवसाय केला तर  ती प्रतिमा उजळू शकते. उद्दोजकांनी तो आदर्श निर्माण करुन आपली काही सामाजिक कर्तव्ये आहेत याचे भान ठेवले पाहिजे असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी पाचव्या मॅक्सेल पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.  सभागृहात त्यावेळेस अनेक स्तारांवरील उद्दोजक, व्यापार-व्यवसायातील यशस्वी व्यक्ति आणि समाजिक क्षेत्रातील नामांकित मंडळी हजर होती. व्यासपीठावर मॅक्सेल फाउंडेशनचे संस्थापक कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार, डॉ. रघुनाथ माशेलकर, कुमार केतकर व सीए शैलेश हरिभक्ती उपस्थित होते. 

राहुल बजाज यांनी आपण सर्वार्थाने महाराष्ट्रीय आहोत आणि आमचे कुटुंब तर अस्सल मराठीच आहे, आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे असे आवर्जजुन सांगितले. कोणताही व्यवसाय करताना तो आपण समाजासाठी करत आहोत हे भान सुटता कामा नये. सध्या एनपीए, सहेतुक कर्जबुडवे, पनामा पेपर्स यासारखी प्रकरणे पुढे आल्यामुळे देशाची व पर्यायाने भारतीय समाजाची प्रतिमा डागाळली गेली आहे. ही स्थिती बदलणे आवश्यक आहे. आज व्यवसाय आणि सरकार समाजासाठी काही करत नाहीत, ही स्थिती दुर्दैवी आहे. स्वातंत्र्यानंतर सरकार हे मायबाप झाले आणि व्यावसायिकांचे सर्व लक्ष व्यवसायापेक्षा कर, अनैतिक व्यवहार, लाच देणे यावर अधिक केंद्रित झाले. याचा थेट परिणाम म्हणून व्यवसायाचे समाजाशी नाते तुटले, अशी खंत राहुल बजाज यांनी व्यक्त केली.

उद्योगजगतामध्ये सत्यं, शिवं व सुंदरम् आले आहेत असे सांगून डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सत्या नादेला, सुंदर पिचाई या भारतीयांची प्रशंसा केली. यामध्ये शिवम् येणे बाकी आहे, याकडे लक्ष वेधले. तरुणांची उद्योगाकडे पाहण्याची दृष्टी आणि विचारधारा बदलते आहे, ही चांगली गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतावरचा जगाचा विश्वास वाढल्याचे सांगून सीए शैलेश हरिभक्ती यांनी माहिती तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान व जैव तंत्रज्ञान या तिन्ही तंत्रज्ञानांध्ये बदल होत आहेत, असे सांगितले. उद्योगजगतात ग्राहकांच्या प्रतिक्रियेपेक्षा उद्योजकाला आपल्या उद्योगाविषयी प्रामाणिकपणे काय वाटते यावर त्या उद्योगाचे भवितव्य अवलंबून राहू लागले आहे. जग हे अवलंबून राहण्याच्या अवस्थेतून आता एकमेकांच्या सहकार्याने पुडे जाण्याच्या स्थितीपर्यंत आले आहे, असेही हरिभक्ती म्हणाले.

आपल्या शिक्षणंपद्दतीत मने खुली करुन जिज्ञासा वढविण्यापेक्षा, मनाची कवाडे बंद करुन त्यांना धर्म, परंपरा, अवास्तव राष्ट्रवाद आणि अतिरेकी अस्मिता आणि खोटे अभिमान यांनाच पुर्वीपासुन जास्त वाव  दिला गेला. जगाचा विध्वंस अशाच प्रवृतींनी केला आहे. हे लक्षात घेऊन शिक्षणाचा उद्देश मन मुक्त करण्याचा असला पहिजे असे जेष्ठ संपादक कुमार केतकर यांनी सांगितले.
मॅक्सेल फाउंडेशनचे संस्थापक व कॉर्पोरेट लॉयर अॅड. नितीन पोतदार यांनी आपल्या प्रास्ताविकात मॅक्सेल हा फक्त पुरस्कार म्हणजे एक छन सोहळा किंवा समारंभ नसुन एक महाराष्ट्राच्या पुढच्या पिढिसाठी उभारलेली उद्दोजकीय चळवळ आहे. त्यांनी तरूणांनी आत्मपरीक्षण, कल्पना व अंमलबजावणी या त्रयींवर लक्ष केंद्रित करावे लागेल, यावर भर दिला.  शालेय स्तरावर उद्योजकता हा विषय यालाच हवा, मात्र त्यासाठी अभ्यासक्रम व शिक्षक तयार करणे हे कठीण काम आहे. यावर उपाय म्हणून मॅक्सप्लोअर हे पुस्तक फाउंडेशनने तयार केल्याचे त्यांनी सांगितले. या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी केले.

मॅक्सप्लोअर- एकसप्लोरिंग आंत्रप्रेन्युअरशिप'

मॅक्सप्लोर या पुस्तकाची गरज अधोरेखित करताना लेखकं श्री. नितीन पोतदार यांनी सांगितलं की २०२०पर्यंत भारत जगातील सर्वात तरुण देश असेल. एकीकडे देशातील हजारो शैक्षणिक संस्थामधून दर वर्षी ३० लाख विद्यार्थी कला, वाणिज्य आणि शास्त्र या विषयात पदवीधर होतात आणि हजारोंच्या संख्येने इंजिनिअर, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ तयार होतात, त्यातील अनेक मात्र बेरोजगार राहतात किंवा आवश्यक ते कौशल्य किंवा क्षमता त्यांच्याकडे नसल्याने ते रोजगारास पात्र असत नाहीत.  

तर दुसरीकडे जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञान यामुळे नव्या ज्ञानाधारीत अर्थव्यवस्थेत स्वयं रोजगार-व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत पण त्यांसाठी लागणार प्रक्टिकल शिक्षण आपण मुलांना देतो का? आज आयडिया हे भांडवल आहे आणि स्टार्टअप हा कळीचा शब्द बनला आहे.
आपल्या बेरोजगारीच्या भीषण प्रश्नाचा आपण नीट तपास केला तर आपल्याला असं दिसतं की आपल्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच कल्पकतेने उद्योजकतेचे धडे मिळणं गरजेचे असल्याचे मत अनेकांकडून वेळोवेळी व्यक्त होत असतं. मात्र भारतात उद्योजकतेचे धडे देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम किंवा पुस्तक नसल्याची खंत अनेक दशकांपासून होती. आणि जरी आपण अस एखादं पुस्तक तयार केलं तरी त्याला सरकारच्या लालफितीत काही वर्ष जातील आणि मान्यता मिळाली तरी या विषयासाठी प्रशिक्षत शिक्षक मिळणं ही मोठी समस्या असणारच आहे. म्हणजे शालेय शिक्षणात उद्दोजकता हा विषय फारतर फक्त कागदावरचं येवु शकतो. 

गेल्या अनेक दशकांची ही खंत दूर करीत मॅक्सप्लोअर- No Syllabus No Teacher! हा प्रक्टिकल प्रोजेक्ट बेस्ड पुस्तकाची निर्मिती इयता आठवी आणि नववीच्या विध्यर्थ्यांसाठी केलेली आहे.  पुढील शैक्षणिक वर्षा मध्ये मुंबई-पुणे स्थित किमान 25 ठराविक शाळांमध्ये हा उपक्रम मॅक्सेल तर्फे निशुल्क राबविणार जाणार आहे.  या संबंधाची जास्त माहिती www.maxellfoundation.org वर मिळु शकेल. सगळ्यात महत्वाच म्हणजे मॅक्सप्लोर प्रोजेक्ट पुर्ण करणार्या खास निवडक मुलांना एअरबस कंपनी तर्फे अभ्यास-सहल आयोजित केली जाणार आहे.

या कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांनीही आपली मनोगते मांडली. पुरस्कार सोहळ्यात मॅक्सेल जीवनगौरव पुरस्कार महिको हायब्रीड सीड्सचे अध्यक्ष डॉ. बी. आर. बारवाले यांना राहुल बजाज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आपण हा पुरस्कार देशातील शेतकऱ्यांच्या वतीने स्वीकारत असल्याचे बारवाले यावेळी म्हणाले.


मॅक्सेल पुरस्कार सोहळ्याला जेष्ठ उद्दोगापती श्री. केसरी पाटील, श्री. दिलिप पिरामल, सिम्बायोसिस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. बी. मुजुमदार यांच्यासह विविध क्षेत्रांतील उद्योजक व व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.