Monday 4 May 2015

मॅक्सेल अवॉर्ड्स २०१५ जाहीर....

मुंबई १ मे२०१५ : पायाभूत सुविधा, दूरदर्शी तरूण नेतृत्व, उदय़ोगाभिमुख आर्थिक धोरणे आणि कुशल मनुष्यबळ यांच्या बळावर महाराष्ट्र देशातील उदय़ोगजगतात सदैव आघाडीवर राहिलेला आहे. पण, महाराष्ट्रात कला-क्रीडा-संस्कृतीच्या बरोबरीने आंत्रप्रेन्युअरशिप, इनोव्हेशन आणि कॉर्पोरेट क्षेत्राकडे सुद्दा आपण गांभिर्याने बघणं आजच्या काळाची गरज आहे. उद्याचा महाराष्ट्र घडताना आपल्याकडे असलेल्या उद्दोगक्षेत्रातील कर्तृत्वाचा आणि अनुभवाचा वारसा पुढिल पिढीला देणं आपल कर्तव्य नव्हे तर आपली जवाबदारी आहे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मॅक्सेल ऍवॉर्ड्स फॉर महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्सची घोषणा आज महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून मॅक्सेल फाऊंडेशन तर्फे करण्यात आम्हाला आनंद होत आहे.

दुबईतील प्रख्यात आर्किटेक्ट-उदय़ोजक अशोक कोरगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असून उदय़ोजकतेच्या वेगवेगळय़ा क्षेत्रांतील अशोक खाडे, मिलिंद बर्वे, मंगेश काळे (पुणे), शिवानी दाणी (नागपुर), अक्षय वर्दे, डॉ. मेधा (पुरव) सामंत (पुणे) यांच्या लखलखीत कामगिरीचा मॅक्सेल ऍर्वार्ड्स देऊन उचित गौरव केला जाणार आहे.

१६ मे २०१५ रोजी वरळी येथील नेहरू ऑडिटोरियममध्ये मॅक्सेल पुरस्कार २०१५ देण्यासाठी केंद्रीय रस्ते व वहातुक मंत्री श्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे शालेय, उच्च व तंत्र शिक्षणं, मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. यापुर्वी २०१२ साली महारष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, २०१३ साली माजी केंद्रीय श्री. सुशील कुमार शिंदे व २०१४ साली श्री शरद पवार हे मॅक्सेल पुरस्कार देण्यासाठी आलेले होते.

मान्यवर निमंत्रितांबरोबरच मॅक्सेल अवॉर्डसचे सल्लागार जागतिक ख्यातीचे वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, लार्सन अँड टुब्रोचे सीईओ आणि संचालक वाय. एम. देवस्थळी, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत, अमेरिकेतील उदय़ोगपती सुनील देशमुख आणि मॅक्सेल फाऊंडेशनचे संस्थापक-विश्वस्त कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा फक्त खास निमंत्रितांच्या उपस्थितीत साजरा होईल.

या पुरस्कारांनी चौथ्या वर्षात उदय़ोजकता आणि व्यवसायाच्या ठरीव साच्यांच्या पलीकडे जाऊन नवी क्षितिजे पादाक्रांत केली आहेत. उदय़ोजकता आणि व्यावसायिक यशाबरोबरच उदय़ोन्मुख उदय़ोजकांमधील वेगळय़ा वाटा धुंडाळणार्या मुशाफिरांचाही सन्मान व्हायला हवा आणि त्याचबरोबर उद्दोजकतेला एक वेगळा आयाम देऊ पाहणार्यां तरूणांच्याच्या पाठीवरही शाबासकीची थाप पडायला हवी, या विचाराने 'वर्देंची'या एका अनोख्या उद्योगक्षेत्रात काम करणार्या तरूण तडफदार अक्षय वर्दे यांना यंदा मॅक्सेल ऍवॉर्ड फॉर यंग आंत्रप्रेन्युअरशिप या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.