Tuesday 17 May 2016

'व्यवसाय यशस्वी होण्यासाठी सामाजिक मूल्ये जपा' ..राहुल बजाज

मुंबई दि. ७ मे २०१६:  व्यापार-व्यवसाय आणि समाज यांचे संबंध सध्या बर्याच अंशी दुराव्याचे आणि संशयाचेही आहेत. आपल्या उद्द्योगपतींची आणि व्यवसायिकांची समाजातील प्रतिमा अभिमान वाटावा अशी नाही. परंतु नैतिकता आणि  आदर्श समाजिक मुल्ये जपून उद्दोगव्यवसाय केला तर  ती प्रतिमा उजळू शकते. उद्दोजकांनी तो आदर्श निर्माण करुन आपली काही सामाजिक कर्तव्ये आहेत याचे भान ठेवले पाहिजे असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी पाचव्या मॅक्सेल पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.  सभागृहात त्यावेळेस अनेक स्तारांवरील उद्दोजक, व्यापार-व्यवसायातील यशस्वी व्यक्ति आणि समाजिक क्षेत्रातील नामांकित मंडळी हजर होती. व्यासपीठावर मॅक्सेल फाउंडेशनचे संस्थापक कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार, डॉ. रघुनाथ माशेलकर, कुमार केतकर व सीए शैलेश हरिभक्ती उपस्थित होते. 

राहुल बजाज यांनी आपण सर्वार्थाने महाराष्ट्रीय आहोत आणि आमचे कुटुंब तर अस्सल मराठीच आहे, आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे असे आवर्जजुन सांगितले. कोणताही व्यवसाय करताना तो आपण समाजासाठी करत आहोत हे भान सुटता कामा नये. सध्या एनपीए, सहेतुक कर्जबुडवे, पनामा पेपर्स यासारखी प्रकरणे पुढे आल्यामुळे देशाची व पर्यायाने भारतीय समाजाची प्रतिमा डागाळली गेली आहे. ही स्थिती बदलणे आवश्यक आहे. आज व्यवसाय आणि सरकार समाजासाठी काही करत नाहीत, ही स्थिती दुर्दैवी आहे. स्वातंत्र्यानंतर सरकार हे मायबाप झाले आणि व्यावसायिकांचे सर्व लक्ष व्यवसायापेक्षा कर, अनैतिक व्यवहार, लाच देणे यावर अधिक केंद्रित झाले. याचा थेट परिणाम म्हणून व्यवसायाचे समाजाशी नाते तुटले, अशी खंत राहुल बजाज यांनी व्यक्त केली.

उद्योगजगतामध्ये सत्यं, शिवं व सुंदरम् आले आहेत असे सांगून डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सत्या नादेला, सुंदर पिचाई या भारतीयांची प्रशंसा केली. यामध्ये शिवम् येणे बाकी आहे, याकडे लक्ष वेधले. तरुणांची उद्योगाकडे पाहण्याची दृष्टी आणि विचारधारा बदलते आहे, ही चांगली गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतावरचा जगाचा विश्वास वाढल्याचे सांगून सीए शैलेश हरिभक्ती यांनी माहिती तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान व जैव तंत्रज्ञान या तिन्ही तंत्रज्ञानांध्ये बदल होत आहेत, असे सांगितले. उद्योगजगतात ग्राहकांच्या प्रतिक्रियेपेक्षा उद्योजकाला आपल्या उद्योगाविषयी प्रामाणिकपणे काय वाटते यावर त्या उद्योगाचे भवितव्य अवलंबून राहू लागले आहे. जग हे अवलंबून राहण्याच्या अवस्थेतून आता एकमेकांच्या सहकार्याने पुडे जाण्याच्या स्थितीपर्यंत आले आहे, असेही हरिभक्ती म्हणाले.

आपल्या शिक्षणंपद्दतीत मने खुली करुन जिज्ञासा वढविण्यापेक्षा, मनाची कवाडे बंद करुन त्यांना धर्म, परंपरा, अवास्तव राष्ट्रवाद आणि अतिरेकी अस्मिता आणि खोटे अभिमान यांनाच पुर्वीपासुन जास्त वाव  दिला गेला. जगाचा विध्वंस अशाच प्रवृतींनी केला आहे. हे लक्षात घेऊन शिक्षणाचा उद्देश मन मुक्त करण्याचा असला पहिजे असे जेष्ठ संपादक कुमार केतकर यांनी सांगितले.
मॅक्सेल फाउंडेशनचे संस्थापक व कॉर्पोरेट लॉयर अॅड. नितीन पोतदार यांनी आपल्या प्रास्ताविकात मॅक्सेल हा फक्त पुरस्कार म्हणजे एक छन सोहळा किंवा समारंभ नसुन एक महाराष्ट्राच्या पुढच्या पिढिसाठी उभारलेली उद्दोजकीय चळवळ आहे. त्यांनी तरूणांनी आत्मपरीक्षण, कल्पना व अंमलबजावणी या त्रयींवर लक्ष केंद्रित करावे लागेल, यावर भर दिला.  शालेय स्तरावर उद्योजकता हा विषय यालाच हवा, मात्र त्यासाठी अभ्यासक्रम व शिक्षक तयार करणे हे कठीण काम आहे. यावर उपाय म्हणून मॅक्सप्लोअर हे पुस्तक फाउंडेशनने तयार केल्याचे त्यांनी सांगितले. या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी केले.

मॅक्सप्लोअर- एकसप्लोरिंग आंत्रप्रेन्युअरशिप'

मॅक्सप्लोर या पुस्तकाची गरज अधोरेखित करताना लेखकं श्री. नितीन पोतदार यांनी सांगितलं की २०२०पर्यंत भारत जगातील सर्वात तरुण देश असेल. एकीकडे देशातील हजारो शैक्षणिक संस्थामधून दर वर्षी ३० लाख विद्यार्थी कला, वाणिज्य आणि शास्त्र या विषयात पदवीधर होतात आणि हजारोंच्या संख्येने इंजिनिअर, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ तयार होतात, त्यातील अनेक मात्र बेरोजगार राहतात किंवा आवश्यक ते कौशल्य किंवा क्षमता त्यांच्याकडे नसल्याने ते रोजगारास पात्र असत नाहीत.  

तर दुसरीकडे जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञान यामुळे नव्या ज्ञानाधारीत अर्थव्यवस्थेत स्वयं रोजगार-व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत पण त्यांसाठी लागणार प्रक्टिकल शिक्षण आपण मुलांना देतो का? आज आयडिया हे भांडवल आहे आणि स्टार्टअप हा कळीचा शब्द बनला आहे.
आपल्या बेरोजगारीच्या भीषण प्रश्नाचा आपण नीट तपास केला तर आपल्याला असं दिसतं की आपल्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच कल्पकतेने उद्योजकतेचे धडे मिळणं गरजेचे असल्याचे मत अनेकांकडून वेळोवेळी व्यक्त होत असतं. मात्र भारतात उद्योजकतेचे धडे देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम किंवा पुस्तक नसल्याची खंत अनेक दशकांपासून होती. आणि जरी आपण अस एखादं पुस्तक तयार केलं तरी त्याला सरकारच्या लालफितीत काही वर्ष जातील आणि मान्यता मिळाली तरी या विषयासाठी प्रशिक्षत शिक्षक मिळणं ही मोठी समस्या असणारच आहे. म्हणजे शालेय शिक्षणात उद्दोजकता हा विषय फारतर फक्त कागदावरचं येवु शकतो. 

गेल्या अनेक दशकांची ही खंत दूर करीत मॅक्सप्लोअर- No Syllabus No Teacher! हा प्रक्टिकल प्रोजेक्ट बेस्ड पुस्तकाची निर्मिती इयता आठवी आणि नववीच्या विध्यर्थ्यांसाठी केलेली आहे.  पुढील शैक्षणिक वर्षा मध्ये मुंबई-पुणे स्थित किमान 25 ठराविक शाळांमध्ये हा उपक्रम मॅक्सेल तर्फे निशुल्क राबविणार जाणार आहे.  या संबंधाची जास्त माहिती www.maxellfoundation.org वर मिळु शकेल. सगळ्यात महत्वाच म्हणजे मॅक्सप्लोर प्रोजेक्ट पुर्ण करणार्या खास निवडक मुलांना एअरबस कंपनी तर्फे अभ्यास-सहल आयोजित केली जाणार आहे.

या कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांनीही आपली मनोगते मांडली. पुरस्कार सोहळ्यात मॅक्सेल जीवनगौरव पुरस्कार महिको हायब्रीड सीड्सचे अध्यक्ष डॉ. बी. आर. बारवाले यांना राहुल बजाज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आपण हा पुरस्कार देशातील शेतकऱ्यांच्या वतीने स्वीकारत असल्याचे बारवाले यावेळी म्हणाले.


मॅक्सेल पुरस्कार सोहळ्याला जेष्ठ उद्दोगापती श्री. केसरी पाटील, श्री. दिलिप पिरामल, सिम्बायोसिस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. बी. मुजुमदार यांच्यासह विविध क्षेत्रांतील उद्योजक व व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Thursday 12 May 2016

मॅक्सेल अवॉर्ड्स २०१६ जाहीर....

मुंबई, 1 मे, 2016:  मॅक्सेल फाऊंडेशनतर्फे कॉर्पोरेट आणि उद्योगक्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या मान्यवरांना पुरस्कार देण्याचे हे सलग पाचवे यशस्वी वर्ष आहे!  पहिल्या वर्षापासूनच कॉर्पोरेट आणि उद्योगक्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार समजला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातील नावीन्यपूर्ण उत्पादन आणि सर्व्हिस सेक्टर मध्ये काम करत असलेल्या उद्योजकांची व कॉर्पोरेटक्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या बिझिनेस-लिडर्सची दखल घेणेतसेच इनोव्हेटर्सचा शोध घेऊन त्यांना जगासमोर आणि खास करून आपल्या पुढिसाठी रोल मॉडेल म्हणून समोर आणणे हा उद्देश हे पुरस्कार देण्यामागे मॅक्सेल फाऊंडेशनचा आहे.

आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून २०१६ ह्या वर्षासाठी मॅक्सेल फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर करण्यात आम्हाला आनंद वाटत आहे. हे विविध पुरस्कार असे आहेत:

कृषि-औद्योगिकक्षेत्रात मुलभूत काम करणारे महाराष्ट्र हायब्रिड सीड कंपनी (महिको)चे चेअरमन व संस्थापक प्रख्यात उद्योजक श्री. बद्रिनारायण रामूलाल बारवाले यांना जीवनगौरव.  कृषि-औद्योगिकक्षेत्रात श्री बारवाले हे अतिशय ख्यातनाम आहेत. भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकर्‍यांना उपलब्ध करून देऊन जणू त्यांनी एकहाती क्रांती घडवून आणली. त्यांच्या ह्या कार्यामुळे बियाणे-उद्योग हे एक क्षेत्रच खाजगी उद्योगक्षेत्राला मिळाले. अशा प्रकारच्या बियाणांचा शोध लावल्यानंतर त्याचे देशभर वितरणते साठवण्याची सुविधा अशा पुरक व्यावसायांचाही विस्तार झालाआणि त्यातून अनेकांना रोजगार मिळाला.

भारत विकास ग्रुपचे संस्थापकचेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक हणमंत आर. गायकवाड यांना 'एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप'शून्य बॅंक बॅलन्स असलेला एक इंजिनिअर ते ३०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या बीव्हिजी ह्या फर्मचा प्रमुख अशी त्यांची वाटचाल आहे. फॅसिलीटी मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करणार्‍या त्यांच्या ह्या फर्मचे काम संपूर्ण भारतभर विस्तारलेले आहे. संसदपंतप्रधानांचे निवासस्थानराष्ट्रपती भवन आणि सुप्रीम कोर्ट यांच्या हाऊसकिपींगचे काम त्यांच्या कंपनीकडे आहे.
एअरबस ग्रुप इंडियाचे इंडस्ट्री डेव्हलपमेंटस्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अॅन्ड ऑफसेट्स यांचे व्हाईस-प्रेसिडेंट आशिष सराफ यांना एक्सलन्स इन बिझिनेस लिडरशिप. एअरबस ग्रुप इंडियाच्या एअरबस हेलिकॉप्टरएअरबस आणि एअरबस डिफेन्स व स्पेस या तिन्ही विभागांची सुत्रे त्यांच्याकडे आहेत. भारताच्या उत्पादन क्षमतेबाबत जगाचा दृष्टिकोन बदलवण्याची महत्वाची कामगिरी आशिष सराफ करत आहेतत्या मार्फत कंपनीच्या मेक इन इंडिया ह्या मोहिमेला त्यांनी बळ दिलेले आहे.

एनप्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे अनुक्रमे व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक श्रीकृष्ण भार्गव करकरे आणि अलका श्रीकृष्ण करकरे यांना एक्सलन्स इन इनोव्हेशन्स. स्कीड-माऊंटेड मॉड्यूलर पायपिंग सिस्टम्सचा नावीन्यपूर्ण शोध त्यांनी लावला. त्यामुळे पेट्रोकेमिकलवीजखतेकागद आणि पोलाद या गुंतागुंतीच्या उद्योगातील प्रक्रियेचे प्लग-व-प्ले असे सुलभीकरण झाले. जीई,सिमेन्सहिताचीमित्सिबिशीइब्रा आणि तोशिबा यासारख्या जागतिक क्लाएंटचे काम ते करतात. ५ लाख चौरस फुटांच्या विस्तिर्ण परिघात १.२५ लाख चौरस फुटांचे वर्कशॉप मरकल येथे एनप्रोने बांधलेले आहे  आणि त्यांच्याकडे आज घडीला ४०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

सिम्बॉयसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगच्या संचालकसिम्बॉयसिस फाऊंडेशनच्या व्हाईस-प्रेसिडेंट आणि सिम्बॉयसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख संचालक, डॉ. स्वाती मजुमदार यांना मॅक्सेल स्पेशल रेक्गनीशन पुरस्कार. देशातील अगदी दूरवर असलेल्या ग्रामीण भागांचा विचार करुन त्यांनी माहिती व दळणवळण तंत्रज्ञान यांचा कल्पकतेने उपयोग करुन घेत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण ह्या भागापर्यंत पोचवले.  ह्यामुळे उद्योगांना आवश्यक असणारे प्रशिक्षित मनूष्यबळ अधिक संख्येने उपलब्ध होईल आणि त्यामुळे देशाच्या मेक इन इंडिया ह्या मोहिमेला मोठ पाठबळच मिळेल.

तसेच मराठवाडा ऑटो क्लस्टरऔरंगबादया संस्थेस मॅक्सेल स्पेशल रेक्गनीशन पुरस्कार. मराठवाडा ऑटो क्लस्टर (एमएसी) ही उद्योगांना पायाभूत सुविधा देणारी सपोर्ट सिस्टम आहे. ही सेवा पुरवतेत्याचसह कौशल्यप्राप्त टेक्निशियन्सचे आणि इतर मनूष्यबळ त्यांच्याकडे आहे. उद्योजक एमएसीबरोबर संपर्क साधून ह्या बाबतीतील आपली गरज पूर्ण करू शकतात. मराठवाडा भागातील औद्योगिक वातावरणात सुधारणा करणे हे उद्दीष्ट ठेवून समान विचारांच्या उद्योजकांनी एकत्र येऊन ही संस्था सुरू केली. उद्योगांना आवश्यक असलेल्या अनेक सेवा एमएसी पुरवतेउदा: प्रोटोटायपिंगलेझर कटींगकटींग स्लिटींग लाईन इत्यादी. तसेच कौशल्य विकास उपक्रमाअंतर्गत उद्योगाशी संबंधित इंजिनिअरींग सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण आणि मिडल मॅनेजमेंट स्तरावरील कर्मचार्‍यांना तांत्रिक प्रशिक्षण देणे आणि प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांना तयार करणे हेही काम एमएसी करते.

बिग बिझनेस अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडचे कन्सल्टींग डायरेक्टरमकरंद पाटील यांना मॅक्सेल स्टार्ट अप पुरस्कार. उद्योगांसाठी संकल्पना ते प्रकल्प कार्यान्वित करणे इथपर्यंतची रुपरेखा देणे ते करतात. त्याचबरोबरउद्योगांना प्रगतीपथावर जाण्यासाठी विविध कल्पना सुचवणेउद्योगाची पुर्नरचना करण्याचा मार्ग सांगणेखर्चात बचतीचे उपाय सुचवणे हेही करतात. तसेच लघू व मध्यम उद्योगांना सल्ला देतात.  त्यांची मुंबईदुबईसिंगापूरघाना आणि स्पेनमध्ये ऑफिसेस आहेत.

एम-इडिकेटर अॅपचे निर्मातेएम-बॉन्ड सॉफ्टवेअर कन्सल्टंसी सर्व्हिसेसचे संस्थापक सचिन टेके यांना मॅक्सेल स्टार्ट अप पुरस्कार. एम-इंडिकेटर हे अतिशय लोकप्रिय मोबाईल अॅप आहे. स्मार्ट फोन वापरणार्‍यांना ह्याविषयी अधिक सांगणे नलगे. लोकलच्या जीवघेण्या गर्दीतून रोजच्या रोज लोकलने प्रवास करणार्‍या एक कोटी प्रवाशांना उपयोगी असणारे मोबाईल त्यांनी अॅप बनवले. त्यातून पुढे भारतीय रेल्वेबेस्ट बस अशा संस्थांनीही या अॅपबरोबर स्वत:ला जोडून घेतले आणि त्याची उपयुक्तता दिवसागणिक आणखीच वाढली.

मॅक्सप्लोर स्कुल

२०२०पर्यंत भारत जगातील सर्वात तरुण देश असेल. एकीकडे देशातील हजारो शैक्षणिक संस्थामधून दर वर्षी ३० लाख विद्यार्थी कला,वाणिज्य आणि शास्त्र या विषयात पदवीधर होतात आणि हजारोंच्या संख्येने इंजिनिअरडॉक्टर आणि शास्त्रज्ञ तयार होतातत्यातील अनेक मात्र बेरोजगार राहतात किंवा आवश्यक ते कौशल्य किंवा क्षमता त्यांच्याकडे नसल्याने ते रोजगारास पात्र असत नाहीत. तर दुसरीकडे जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञान यामुळे नव्या ज्ञानाधारीत अर्थव्यवस्थेत रोजगार-व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. आज आयडिया हे भांडवल आहे आणि स्टार्ट अप हा कळीचा शब्द बनला आहे आणि म्हणू उद्दोजाकाता मुलांना लहान वयातच शिकवलं जाव ही काळाची गरज आहे.

 आपल्या बेरोजगारीच्या प्रश्नाचा आपण नीट तपास केला तर आपल्याला असं दिसतं की पाठ्यपुस्तकांतून विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच उद्योजकतेचे धडे मिळणं गरजेचे असल्याचे मत अनेकांकडून वेळोवेळी व्यक्त होत असतं. मात्र भारतात उद्योजकतेचे धडे देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम किंवा पुस्तक नसल्याची खंत अनेक दशकांपासून होती. आणि जरी आपण पुस्तक तयार केलं तरी त्याला प्रशिक्षत शिक्षक मिळणं ही मोठी समस्या असेल. गेल्या अनेक दशकांची ही खंत मक्सेल फाऊंडेशच्या नितीन पोतदार यांनी दूर करीतमॅक्सप्लोअर- नाही पाठ्यक्रम!  नाही शिक्षक!! हा प्रक्टिकल प्रोजेक्ट बेस्ड पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन 7 मे रोजी उद्योजक राहुल बजाज यांच्याहस्ते होणार आहे. मॅक्सेल तर्फे पुढील शैक्षणिक वर्षा मध्ये मुंबईच्या 25 ठराविक शाळांमध्ये (इयता आठवी किंवा नववी) हा दोन महिन्यांचा हा उपक्रम निशुल्क राबविला जाणार आहे.  या संबंधाची जास्त माहिती www.maxellfoundation.org किंवा maxplore9@gmail.com वर मिळु शकेल.

 7 मे 2016 रोजी वरळी येथील नेहरू ऑडिटोरियममध्ये मॅक्सेल पुरस्कार २०१६ देण्यासाठी जेष्ठ उद्दोजक श्री. राहूलं बजाजचेअरमन बजाज ऑटो ग्रुपयांना आमंत्रित करण्यात आलेले आहे.  मान्यवर निमंत्रितांबरोबरच मॅक्सेल अवॉर्डसचे सल्लागार जागतिक ख्यातीचे वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकरज्येष्ठ संपादक कुमार केतकरआणि मॅक्सेल फाऊंडेशनचे संस्थापक-विश्वस्त कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा फक्त खास निमंत्रितांच्या उपस्थितीत साजरा होईल.  अतिशय दिमाखदार वातावरणात दरवर्षी हा मॅक्सेल पुरस्कार सोहळा संपन्न होतो हेही याचे वैशिष्ट्य आहे.

Monday 18 May 2015

‘मेक-इन-महाराष्ट्रासाठी’ तरुण उद्दोजाकांची एक नवीन पिढी तयार होण गरजेच

मुंबई दिनांक १६ मे २०१५ :   महाराष्ट्राच्या उद्योग, कॉर्पोरेट, इन्होवेशन व समाजसेवा जगात उत्तुंग भरारी घेऊन, आपल्या कर्तृत्वाच्या याशाचा झेंडासातासमुद्रापार फडकवणाऱ्यामहाराष्ट्रातील यशस्वी उद्योजकांना'मॅक्सेल फाऊंडेशन'च्या वतीने देण्यात येणाऱ्या 'मॅक्सेल – म्हणजे महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलंस अवार्डस पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.  महाराष्ट्रात उद्योजकतेबाबत जागरुकता निर्माण करणे,  पुढील पिढीला त्यांची स्वप्नवास्तवात आणण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांच्यामधील क्षमतांना कार्यरुप देणे हा मॅक्सेल अवार्डमागचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ मंत्री सुभाष देसाई उद्योग विभाग व शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.  या सोहळ्याला उपस्थित जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी या उद्योजकांना सतत नाविन्यपूर्ण संशोधन करीत राहाण्याचा कानमंत्र दिला. तर मराठी माणसाने स्वतःचे ब्रँडिंग करायला पाहिजे,असे अॅडगुरू भरत दाभोळकर यांनी या सोहळ्याला उपस्थित असलेलेल्या उद्योग क्षेत्रातील मराठी मंडळींना सांगितले.


'मॅक्सेलचे हे चौथे वर्ष आहे. यावर्षीचा 'एक्सलन्स इन एन्टरप्रेन्युअरशिप पुरस्कार' खाडे ऑफशोअर इंजिनीअरिंगचे एमडी अशोक खाडे, 'एक्सलन्स इन बिझनेस लिडरशीप पुरस्कार'एचडीएफसीचे अॅसेट मनेजमेंट कंपनीचे एमडी मिलिंद बर्वे, 'एक्सलन्स इन इमर्जिंग एक्सलन्स पुरस्कार मनी बी इन्स्टिट्यूटच्या डायरक्टेर शिवानी दाणी, 'एक्सलन्स इन इनोव्हेशन पुरस्कार' प्रिसिजन आटोमेशन अँड रोबोटिक्स इंडियाचे एमडी मंगेश काळे, 'यंग एंटरप्रेन्युअर पुरस्कार' वर्देची मोटारसायकल्सचे एमडी अक्षय वर्दे, 'एक्सलन्स इन सोशल एन्टरप्रेन्युअरशिप पुरस्कार' अन्नपूर्णा परिवार संस्थेच्या संस्थापिका डॉ. मेधा (पुरव) सामंत आणि 'लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार' आर्च ग्रुप कन्सल्टंटचे संस्थापक व व्यवस्थापकीय भागीदार आर्किटेक्ट अशोक कोरगावकर यांना प्रदान करण्यात आला.


वरळीतील नेहरू सेंटरमध्ये शनिवारी रात्री आयोजित एका शानदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्याला जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ व पद्मभूषण पुरस्कार विजेते डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षण मंत्री विनोद तावडे, केरळ हायकोर्टाचे निवृत्त न्या. अरविंद सावंत, मॅक्सेल फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त नितीन पोतदार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, सिंधुताई सकपाळ, भरत दाभोळकर यांच्यासह व्यावसायिक जगतातील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती.

‘मेक-इन-महाराष्ट्रासाठी’ तरुण उद्दोजकांची एक नवीन पिढी तयार होण गरजेच आहे – नितीन पोतदार

पुढील पिढीने ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेचा पुरेपूर लाभ घ्यावा यासाठी एक – ‘इको सिस्टीम’निर्माण करणे हे मॅक्सेल फाऊंडेशनचे व्हिजन आहे. तरुणांनी क्रिएटीव्ह रहावे व उत्पादक मालमत्ता निर्माण करावी यासाठी हा प्रयत्न आहे. याकरताच मॅक्सेलने खाली दिलेल्या तीन कलमी अजेंड्याची घोषणा श्री. नितीन पोतदारांनी त्याच्या प्रास्ताविक भाषणात केली ती अशी :
1) या करता सुरवात म्हणून मॅक्सेल फाऊंडेशनने मागील वर्षी मॅक्सप्लोअर - एक्सप्लोरींग आंत्रेपुरनरशिप म्हणजेच उद्योजकतेचा शोध घेणे हा उपक्रम मुंबई विद्यापिठातील लाईफ लॉंग लर्निंग ॲन्ड एक्सटेंशन यांच्या सहकार्याने अंमलात आणला. यामुळे विद्यार्थ्यांना आत्मपरिक्षण करणे, कल्पकता दाखवणे आणि उद्योगाच्या बाबतीतील आयडिया प्रत्यक्षात आणणे यात मदत झाली.
पहिल्या वर्षातच मुंबई व ठाणे जिल्ह्यातील ३० कॉलेजमधील १२०० विद्यार्थ्यांपर्यंत मॅक्सप्लोअर उपक्रम पोचू शकला. यावर्षी मॅक्सेलने वेलिंगकर यांच्या वुई स्कूलबरोबर टाय-अप केलेले आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर विस्तार करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. पूणे, नासिक,नागपूर, अहमदनगर, कोल्हापूर आणि रत्नागिरी, कोकण विभाग अशा महाराष्ट्राच्या इतर भागातही आम्ही हा उपक्रम नेऊ. महत्वाच्या कॉलेजेसमधील ५००० विद्यार्थ्यांपर्यंत पोचणे हे उद्दीष्ट आहे.  

2) उद्दोजाकातेसाठे अभ्यासक्रम :  उद्योजकतेबाबत मॅक्सेल फाऊंडेशन एक विस्तृत अभ्यासक्रम तयार करत आहे. शाळा व महाविद्यालयात उद्योजकतेवर जी पाठ्यपुस्तके आहेत त्यात याचा समावेश होऊ शकेल. इतिहास, भूगोल गणित आणि विज्ञान यासारखाच उद्योजकता हाही एक विषय शालेय अभ्यासक्रमात सुरु करणे हे एक क्रांतिकारी पाऊल होईल व भारतात अशा प्रकारचे हे पहिलेच पाऊल असेल.  विद्यार्थ्यांना कल्पकता दाखवणे व उत्पादक मालमत्तेचे निर्माण करणे यात यामुळे भाग घेता येईल.

3) उद्योग खात्याबरोबर उपक्रम: शिक्षण व्यवस्था व उद्योगजगत यांचा एकमेकांबरोबर निकटचा संबंध असणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यभर इंटर्नशिप प्रोग्रॅम सुरु होण गरजेच आहे. यामुळे बहुविध चांगल्या गोष्टी घडतील; विद्यार्थ्यांना थेट कौशल्य शिकण्याची संधी मिळेल, त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि उद्योगजगताला प्रशिक्षित/कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मिळेल. मॅक्सेल फाऊंडेशन उद्योग खात्याच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीयल लॉ अंतर्गत इंटर्नशिप ॲक्टचा कायदा तयार करण्यास ऊत्सुक आहे.

'मॅक्सप्लोअर योजना'नेत नवीन तरुण उद्दोजक व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सर्व प्रस्थापित उद्योजकांनी त्यांच्या कारखान्यात युवकांना इंटर्नशीप देण्याची सूचना पोतदार यांनी केली. 'राज्यात दहा कोटी लोकसंख्या आहे. पाच जणांचे एक कुटुंब गृहीत धरले, तर एक हजार कुटुंबाच्या मागे एक नवीन उद्योगती तयार करायला आम्हाला यश मिळाले, तर भविष्यात २० हजार उद्योजक तयार होतील. त्यांनी ५० जणांना रोजगार दिला, तर दहा लाख नोकऱ्या उपलब्ध होतील,' असे श्री पोतदार म्हणाले.


भारतीयांमध्ये प्रचंड हुशारी - डॉ. रघुनाथ माशेलकर 

डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या भाषणात देशाच्या औद्योगिक प्रगतीचा आढावा घेतला. भारताच्या मंगळयान मोहिमचे उदाहरण देऊन ते म्हणाले, 'भारतीयांमध्ये प्रचंड हुशारी आहे. अमेरिकेपेक्षा दहा पट कमी खर्चात भारताने मंगळयान मोहीम फत्ते केली.' तर साफ्टवेअरमधील आयसीचे म्हणजे इंटिग्रेटेड सर्किटचे उदाहरण देताना, आयसीमुळे संपूर्ण क्रांती झाली. आता आयसी म्हणजे इंडिया व चीन असे समीकरण झाले आहे. हे दोन देश जगाचे नेतृत्व करतील,लोकांना परवडणारी उत्पादने हेच दोन देश तयार करतील. त्याचवेळी महाराष्ट्रानेही उद्योगात प्रगती केली पाहिजे. त्यासाठी आपण मनोवृत्तीतही बदल केला पाहिजे, असे ते म्हणाले.

व्यावहारिक शिक्षण देण गरजेच - शिक्षण मंत्री विनोद तावडे  

महाराष्ट्रातील शिक्षणपध्दतीत व शिक्षणात आमुलाग्र परिवर्तनाची आवश्यकता आहे. उद्योजकेतची सुरवात तळापासून व शाळेतूनच व्हायला हवी, तो केवळ माहाविदयालयीन शिक्षणातील एक विषय असू नये. शिक्षणात गुंतवणूक ही भविष्यकाळासाठी केलेली गुंतवणूक आहे आणि आमचे शासन हे शिक्षणपध्दतीत पूर्ण बदल आणण्यासाठी कटीबध्द आहे. मॅक्सप्लोअर सारखे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेसमध्ये नेले पाहिजेत असे शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले.

तरुणासाठी महाराष्ट्रात व्हेंचर कॅपिटल फंड – उद्दोग मंत्री शुभाष देसाई  

उद्योग खात्याचे मंत्री श्री सुभाष देसाई, यांनी या प्रसंगी म्हणाले की महाराष्ट्रात शिक्षीत व इंग्लिश बोलू शकणारे मनुष्यबळ आहे त्यामुळे जागतिक कंपन्यांना या राज्यात येण्याची इच्छा असते. उद्योजकतेचे महत्वा ओळखून महाराष्ट्र शासनाने सिडबीच्या सहकार्याने २०० कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड उभारण्याचे योजले आहे. अतिलघु, लघु व मध्यम आकाराचे उद्योग यांना भांडवलाची नेहमीच अडचण असते. या व्हेंचर कॅपिटल फंडातून त्यांना सुलभ वित्त पुरवठा करण्यात येईल.

स्वतःचे ब्रँडिंग करा – भारत दाभोळकर

मराठी माणसाकडे सर्व गोष्टी आहेत. पण, मराठी माणसे स्वतःचे ब्रँडिंग करण्यात कमी पडतात, हे सांगताना अॅडगुरू भरत दाभोळकर यांनी ब्रँडिंग व जाहिरातीवर एक सादरीकरण केले. अमूलच्या जाहिरातीमागील यशाचे गमक त्यांनी समजावून सांगितले. जाहिरात यशस्वी करण्याचे तंत्र सांगितले. मराठी माणसाने स्वतःचे ब्रँडिंग करण्याचा मंत्र उपस्थितांना दिला.



शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका - अशोक खाडे 

या पुरस्कारानंतर मनोगत व्यक्त करताना, 'खाडे ऑफशोअर'चे अशोक खाडे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका. तुम्हाला पुढे खूप काही साध्य करायचे आहे. जे गेले ते ओझे होते, राहिले ते माझे आहे हे लक्षात ठेवा,' असा सल्ला त्यांनी दिला.

Monday 4 May 2015

मॅक्सेल अवॉर्ड्स २०१५ जाहीर....

मुंबई १ मे२०१५ : पायाभूत सुविधा, दूरदर्शी तरूण नेतृत्व, उदय़ोगाभिमुख आर्थिक धोरणे आणि कुशल मनुष्यबळ यांच्या बळावर महाराष्ट्र देशातील उदय़ोगजगतात सदैव आघाडीवर राहिलेला आहे. पण, महाराष्ट्रात कला-क्रीडा-संस्कृतीच्या बरोबरीने आंत्रप्रेन्युअरशिप, इनोव्हेशन आणि कॉर्पोरेट क्षेत्राकडे सुद्दा आपण गांभिर्याने बघणं आजच्या काळाची गरज आहे. उद्याचा महाराष्ट्र घडताना आपल्याकडे असलेल्या उद्दोगक्षेत्रातील कर्तृत्वाचा आणि अनुभवाचा वारसा पुढिल पिढीला देणं आपल कर्तव्य नव्हे तर आपली जवाबदारी आहे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मॅक्सेल ऍवॉर्ड्स फॉर महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्सची घोषणा आज महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून मॅक्सेल फाऊंडेशन तर्फे करण्यात आम्हाला आनंद होत आहे.

दुबईतील प्रख्यात आर्किटेक्ट-उदय़ोजक अशोक कोरगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असून उदय़ोजकतेच्या वेगवेगळय़ा क्षेत्रांतील अशोक खाडे, मिलिंद बर्वे, मंगेश काळे (पुणे), शिवानी दाणी (नागपुर), अक्षय वर्दे, डॉ. मेधा (पुरव) सामंत (पुणे) यांच्या लखलखीत कामगिरीचा मॅक्सेल ऍर्वार्ड्स देऊन उचित गौरव केला जाणार आहे.

१६ मे २०१५ रोजी वरळी येथील नेहरू ऑडिटोरियममध्ये मॅक्सेल पुरस्कार २०१५ देण्यासाठी केंद्रीय रस्ते व वहातुक मंत्री श्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे शालेय, उच्च व तंत्र शिक्षणं, मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. यापुर्वी २०१२ साली महारष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, २०१३ साली माजी केंद्रीय श्री. सुशील कुमार शिंदे व २०१४ साली श्री शरद पवार हे मॅक्सेल पुरस्कार देण्यासाठी आलेले होते.

मान्यवर निमंत्रितांबरोबरच मॅक्सेल अवॉर्डसचे सल्लागार जागतिक ख्यातीचे वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, लार्सन अँड टुब्रोचे सीईओ आणि संचालक वाय. एम. देवस्थळी, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत, अमेरिकेतील उदय़ोगपती सुनील देशमुख आणि मॅक्सेल फाऊंडेशनचे संस्थापक-विश्वस्त कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा फक्त खास निमंत्रितांच्या उपस्थितीत साजरा होईल.

या पुरस्कारांनी चौथ्या वर्षात उदय़ोजकता आणि व्यवसायाच्या ठरीव साच्यांच्या पलीकडे जाऊन नवी क्षितिजे पादाक्रांत केली आहेत. उदय़ोजकता आणि व्यावसायिक यशाबरोबरच उदय़ोन्मुख उदय़ोजकांमधील वेगळय़ा वाटा धुंडाळणार्या मुशाफिरांचाही सन्मान व्हायला हवा आणि त्याचबरोबर उद्दोजकतेला एक वेगळा आयाम देऊ पाहणार्यां तरूणांच्याच्या पाठीवरही शाबासकीची थाप पडायला हवी, या विचाराने 'वर्देंची'या एका अनोख्या उद्योगक्षेत्रात काम करणार्या तरूण तडफदार अक्षय वर्दे यांना यंदा मॅक्सेल ऍवॉर्ड फॉर यंग आंत्रप्रेन्युअरशिप या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Friday 12 December 2014

Maxplore Exploring Entrepreneurship




University of Mumbai, Department of Life Long Learning & Extension (DLLE) in association with Maxell Foundation has organized a seminar titled “Maxplore – Exploring Enterpreneurship”, on 15th Dec. 2014 at Ramnarian Ruia College, Matunga, followed by Chandrabhan Colleges in Powai on 17th & Bandokar College, Thane on 19th Dec. 2014 (www.maxellfoundation.org ). 
In the age of Globalization and Information Technology, where ‘Idea is Capital’ it is important that our youth become Job Creators and not just Job Seekers.‘Stay hungry, Stay Foolish’ is the only mantra that needs to be followed.The Seminar is would assist students to step by step, introspect, ideate and implement their own dreams.This would be followed by two days detailed Workshop on 'Enterpreneurship' for select students on first come first serve basis.

It is sad that our universities have become the factories producing millions of graduates every year, majority of them being unemployable.In contrast, our Industries and Jobs are growing at a much slower pace. Consequently, they are unable to employ all of them. It is important to understand that Education should not necessarily lead to Employment, but it must also lead to Enterpreneurship.It is in this background that Maxplore would prompt the students to think with open mind to be Job Creators and participate in the Nation Building campaign of ‘Make in India’.

The Seminar would be inaugurated by Ms Shaina NC, National Spokesperson BJP along with Shri Vijay Kumar Gautam, IAS, Commissioner, Employment, Self Employment, Skill Development and Director(Training), Government of Maharashtra.

The Seminar would be addressed by Nitin Potdar, Corporate Lawyer and Founder Trustee Maxell Foundation, followed by technical sessions, illustrations and Q&A for students.  
This would be followed by two similar programs at Powai and Thane on the 17th and 19th December respectively.  It is expected that around 30 colleges would send their students registered with the DLLE Program.

Maxell Foundation
Dated: 12th December, 2014



Wednesday 25 June 2014

Award Press Release - 2014

मुंबई दिनांक:  20 जुन 2014 :  महाराष्ट्रातील माणसं नको तेवढी चिकित्सक आहेत, काही नवीन करण्याचा प्रयत्न झाला की लगेच अनेक प्रकारच्या शंका घेतल्या जातात. वृत्तपत्रांतून रकानेच्या रकाने लिखाण केलं जातं. ही बदलाला, नवनिर्मितीला विरोध करणारी नकारात्मकता घालवण्याची गरज आज महाराष्ट्रात फार मोठी आहे, मॅक्सेल पुरस्कार हा समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा, नवतेचा पुरस्कार करणारा गौरवशाली उपक्रम आहेअसे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले.

वरळी येथील नेहरू सेंटर येथे झालेल्या मॅक्सेल फाऊंडेशनच्यामॅक्सेल महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स अॅवॉर्डस्लोकनेते श्री. शरद  पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कोल्हापूरचे उद्योजक बापूसाहेब जाधव, केपीआयटीचे रवी पंडित आणि किशोर पाटील, सीमा वैद्य मोदी, व्हॅल्यूएबल ग्रुपचे संजय गायकवाड, ग्रामीण शिक्षणासाठी काम करणारे प्रदीप लोखंडे, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या निर्मला कांदळगावकरएमसीईडीमहाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, औरंगाबाद  आणि अमेरिकेतल्या केरा माटकचे अध्यक्ष अशोक जोशी या मान्यवरांचा  मॅक्सेल पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.

कोणताही नवीन प्रकल्प हाती घेतला की टीका सहन करावी लागते. महाराष्ट्राच्या राजकारणात  गेली पन्नास वर्षं वावरताना मलाही अशी टीका सहन करावी लागली आहे. मी ती सहनही  केली असे पवार म्हणाले.   यावेळी दाभोळ मधील एन्रॉन प्रकल्पाचे उदाहरण देताना पवार म्हणाले की, महाराष्ट्राला विजेची गरज होती. या वीजनिर्मिातीसाठी सरकारी तिजोरीतून पैसा जाऊ नये म्हणून एन्रॉन कंपनीशी बोलून दाभोळमध्ये वीज प्रकल्प उभा केला. परंतु, या बाबत अतिरेकी टीका झाली. त्यामुळे प्रकल्प चार वर्ष बंद पडून पुन्हा सुरू झाला. नवे काही स्वीकारले जात नाही याचा अनुभव लवासाच्या माध्यमातून पुन्हा आला. हा प्रकल्प साकारणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला प्रचंड विरोध झाला. परंतु, आज या प्रकल्पाला हजारो कुटुंबं भेट देतात. महाराष्ट्रात अशी ३० ठिकाणे आहेत, जिथे असे प्रकल्प साकारता येतील. पण त्यासाठी नकारात्मक मानसिकता बदलण्याची गरज आहे. शेतीच्या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने विकसित करण्यात आलेल्या जीएम बियाणांना विरोध होतो, परंतु, याच बीजांपासून तयार केलेल्या डाळी आणिण तेल हजारो कोटी रुपये मोजून आयात केले जातात, असे सांगून त्यांनी या विरोधातला फोलपणा स्पष्ट केला. ज्यामुळे  हवामान, माती, आणिा मानवी आरोग्यावर परिणाम होणार  नाही, अशा संशोधनाला विरोध होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. अनिल काकोडकर या कार्यक्रमात बोलतांना म्हणाले की, “देशात ५० रीसर्च पार्क बनवण्याची योजना अनेक वर्षांपूर्वी आखली गेली  आहे. प्रत्यक्षात दोनच पार्क्सची निर्मिती होऊ शकली. यातून आपली संशोधनाची गती लक्षात येते, चीनमध्ये अशी ३०० रीसर्च पार्क कार्यरत आहेत, संशोधनाची स्पर्धा जिंकायची असेल तर त्यासाठी कुठल्या स्तराची तयारी करावी लागेल याची कल्पना करामहाराष्ट्रातल्या संशोधन करणाऱ्या  संस्थांना एकत्र आणण्याची आज गरज आहे. त्यांचे जाळे उभे करण्याची गरज आहे. त्यांना बळ  दिलं तरच ग्लोबल महाराष्ट्राचे स्वप्न साकार होवू शकेलअसे मतही त्यांनी मांडले

त्या आधी मॅक्सेल फाऊंडेशनचे संस्थापक ट्रस्टी नितीन पोतदार यांनी मॅक्सेलची संकल्पना विशद केलीते म्हणाले की, “मॅक्सेल हा एक फक्त पुरस्कार सोहळा नसून ती महाराष्ट्राच्या तरूणांमध्ये उद्योजकता  निर्माण करण्यासाठीची एक चळवळ आहे!”   महाराष्ट्राची ओळखग्लोबलव्हावी या साठी त्यांनीमॅक्स-महाराष्ट्रया  डॉक्युमेंटचे सादरीकरण केले. पुढे पोतदार यांनी आपली काही मते स्पष्ट स्वरुपात नोंदवली.  “ महाराष्ट्राची पहिली ओळखं ही सहकार-चळवळं! मात्र सहकारक्षेत्रात गुजरातच्याअमुल ने मोठं नाव केलं, त्यानंतर आले ते मेडिकल आणि इंजिनिअरिंगची  विनाअनुदान कॉलेजेस, पण त्यांना एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त यश मिळू शकलं नाही, किंबहुना आपण तसे प्रयत्नच केले नाही. १९९०  सालानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत परदेशी गुंतवणुक आली, आपण एक प्रगत राज्य म्हणून ओळखलो जाऊ लागलो, पण दुर्दैव असं की त्यातून महाराष्ट्राची जागतिक ओळखं निर्माण झाली नाही. त्या मानाने हैद्राबादला त्यावेळचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडुंनी मोठे काम केले. अर्थात  अजूनही  वेळ गेलेली नाहीजर महाराष्ट्राने (1) मिडिया अॅण्ड एन्टरटेनमेंट, (2) मॅनेजमेंट-एज्युकेशन रिसर्च अणि (3)  इन्फ्रास्ट्रक्चरला लागणारी अवजड मशिनरी  या  क्षेत्रात  काम केलं तर  आपण महाराष्ट्राला जागतिक  स्तरावर नेऊ शकतो. .  

एन्टरटेनमेंट म्हणजे नुसत सिनेमा नसुन त्यात आता  गेमिंग़ आणि अॅ निमेशन हे सुद्दा स्वतंत्र्य उद्दोग म्हणुन उदयाला आले आहेतमहाराष्ट्रात जर आपण  जागतिक किर्तीचे स्ट्युडिओज म्हणेज 20 सेंचुरी फॉक्स, डिस्ने, एमजीएम, सोनी  आणु  शकलो तर  महाराष्ट्राच्या मिडिआ इंडस्ट्रीला  जागतिक पातळीवर स्वतंत्र  ओळखं निर्माण मिळू  शकेल. त्याचप्रमाणे  उच्चतम  मॅनेजमेंट-एज्युकेशन रिसर्च साठी  जागतिक किर्ती असलेल्या संस्था म्हणजे  हारवर्ड, स्टंफोर्ड, एमआयटी, लंडन स्कुल ऑफ एकोनॉमिक्स यांना  आपण  महाराष्ट्रात आणु शकलो तर महाराष्ट्राच्या मध्यम वर्गातल्या मुलांना  देखिल उच्च दर्जाच  शिक्षणं मिळु  शकेल आणि मराठी तरूणांना जागतिक  बाजारपेठेत निर्णायक भूमिकेत काम करता येईल.   देशाला आज बेस्ट आणि  बेसिक इन्फ्रास्ट्रक्चची गरज आहे. त्यासाठी आपण  जगातील मोठ-मोठ्या कंपन्याना  जर  महाराष्ट्रात आणु शकलो तर महाराष्ट्र या क्षेत्रात देखील आपला ठसा उमटवू शकतो”, असे मत पोतदार यांनी व्यक्त केले

हा धागा  पकडूनअमेरिकेची एकेकाळी ओळख तेथील मोटारी आणि  कारखाने होती, पण आज त्यांची ओळख मॅकडोनाल्ड आणिे केंटुकी ही आहे, विकासाची व्याख्या बदलतेय परंतु, विकास म्हणजे केवळ जीडीपी नाही. तर त्याला सामाजिक आणिच सांस्कृतिक आशयही आहे आणि मॅक्सेल फाऊंडेशनने पुरस्कार देताना हा आशय जपला आहे,' असे मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला फार मोठ्या संख्येने उद्योजक , बिझीनेस लिडर्स आणि समाजातील प्रतिष्टित मंडळी आवर्जुन उपस्थित होतीकार्यक्रम एलआयसी ने प्रायोजित केला होता.